तुमची प्रेमळ गर्लफ्रेंड बायको झाल्यावर भांडखोर झाली आहे का; कसं पुन्हा मिळवाल तिचं प्रेम?
लग्नानंतर बायको होताच तू किती बदलली, असं गर्लफ्रेंडशी लग्न करणारा प्रत्येक पुरुष म्हणतो.
|
1/ 8
आपली गर्लफ्रेंड आपली बायको झाल्यानंतर प्रत्येक पुरुषाला आनंद वाटतो. आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी जोडीदार आपल्याला मिळाली अशी भावना त्याची असते. तुम्हालाही त्या क्षणी तसाच आनंद झाला असेल.
2/ 8
मात्र काही दिवसांत तुमच्या प्रेमळ जोडीदाराच्या स्वभावात तुम्हाला बदल झालेला दिसत असेल. ती पहिल्यासारखी प्रेमळ नाही तर भांडखोर झाल्याचं तुम्हाला दिसून आलं असेल. ती खूपखूप चिडचिड करत असल्याचं तुम्हाला समजेल.
3/ 8
मुलींना माहेरी जे प्रेम, माया, आपुलकी मिळते तशी त्यांना सासरी मिळत असल्याचं वाटत नाही आणि हेच त्यांच्या स्वभावात बदल होण्याचं मुख्य कारण आहे.
4/ 8
सुनेनं कितीही प्रयत्न केले तरी सून ती सून आणि मुलगी ती मुलगी. सुनेला मुलीप्रमाणे प्रेम कधीच मिळत नाही.
5/ 8
लग्नानंतर मुलींच्या आयुष्यातील पर्सनल स्पेस राहत नाही. मुलींना इतरांना काय वाटतं, इतर काय सांगतात त्यानुसार राहावं लागतं.
6/ 8
लग्नानंतर लगेचच आई होण्याचा विचार नसेल तर तिला सासरच्यांकडून खूप काही ऐकून घ्यावं लागतं.
7/ 8
लग्न झाल्यावर घर आणि ऑफिस यामध्ये आपल्याला स्वत:साठी वेळच देता येत नाही असं मुलींना वाटतं.
8/ 8
आपण लग्न का केलं, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होते. अशावेळी तिच्या पतीने तिच्या समस्या समजून घेऊन तिला यात मदत केली तर नक्कीच तिचा स्वभाव आधीप्रमाणे होईल.