'पुरे मोहल्ले का भेज दिया क्या?’ विजेचं बिल पाहून भज्जीही झाले हैराण
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत विजेचं बिल पाहून अनेकांनी तक्रार व्यक्त केली आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनंतर आता हरभजन सिंह यांनी विजेच्या बिलावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
|
1/ 6
भारतीय ऑफ स्पिनर हरभजन सिंह सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. भज्जी यंदा मुंबईतील आपल्या घरी आलेल्या विजेच्या बिलाबाबत नाराज असल्याचे दिसून आले आहे.
2/ 6
हरभजन सिंह यांच्यानुसार मुंबईतील त्यांच्या घराचं विजेचं बिल 33,900 रुपये आलं आहे. ज्यावर ते नाराज असल्याचे दिसून आलं.
3/ 6
हरभजन सिंह यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. त्यात खोचकपणे संपूर्ण परिसराचं बिल मला एकट्याला पाठवलं का, असंही विचारलं आहे
4/ 6
हरभजन सिंह यांनी ट्विट करुन लिहिलं आहेकी – इतकं बिल, संपूर्ण परिसराचं लावलं का? नेहमी येणाऱ्या बिलपेक्षा सात पट जास्त??? वाह
5/ 6
हरभजन सिंह यांनी भारतासाठी 103 टेस्ट सामन्यांमध्ये 417 विकेट घेतले आहेत. हरभजन 2016 मध्ये भारतीय टीममध्ये नव्हते
6/ 6
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील त्यातही विशेष करुन मुंबई राहणाऱ्यांना ज्यादा बिल येत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. हरभजन सिंह यांच्या पूर्वी काही कलाकारांनी ज्यादा बिलाची तक्रार केली आहे.