ग्लेशियर खरं तर बर्फाची एक नदी असते जी मंद गतीनं वाहत असते. ग्लेशियर दोन प्रकारचे असतात. यातला पहिला प्रकार म्हणजे, अल्पाइन ग्लेशियर म्हणजेच घाटी किंवा डोंगरांवर असणारं ग्लेशियर आणि दुसरं म्हणजेच बर्फाची चादर. उत्तराखंडमध्ये घडलेल्या घटनेचा संबंध घाटातील ग्लेशियरसोबत आहे. हेच ग्लेशियर जास्त धोकादायक समजले जातात.
सध्याच्या काळात पृथ्वीचा दहावा हिस्सा ग्लेशियरनं झाकला गेला आहे. ग्लेशियर अशा ठिकाणी असतात, जिथे प्रत्येक वर्षी बर्फ जमा होता आणि त्यानंतर तो वितळू लागतो. हा बर्फ पुढे मोठ्या गोळ्यांमध्ये बदलतो. यानंतर पडणारा नवा बर्फ याला आणखी खाली दाबतो आणि ते कठोर होतं. यालाच फिर्न असं म्हणतात. या प्रक्रियेत या बर्फाची मात्रा विशाल होत जाते. या दबावामुळं अधिक तापमान नसतानाही हा बर्फ वितळायला सुरूवात होते आणि आपल्याच वजनानं वाहू लागतो. पुढे हेच हिमनदीचं रूप प्राप्त करून घाटीमध्ये वाहायला लागतं.
घाटांवरील ग्लेशियर अनेकदा धोकादायक होतात. साधारणतः ग्लेशियर घाटीकडे हळूहळून वाहत असतात. मात्र, काही ग्लेशियरमध्ये सुरूवातीपासून बर्फ पूर्ण वाहात नाही. त्यामुळे, याला हिमसखलनाचं रूप प्राप्त होतं. यामध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ घाटांवरुन खाली पडू लागतो, जसं आज निती घाटामध्ये झालं. विशाल प्रमाणात या बर्फाच्या वाहत जाण्यामुळं आसपास असणारं सगळं काही याच्या दबावात येतं. इतकंच नाही, तर वरच्या भागामध्ये तडा जाण्यास सुरूवात होते, त्यामुळे ते सहजरित्या फुटतात.
तसं, बहुतेक हिमनदी दररोज काही सेमीच्या वेगाने वाहतात. परंतु काही एक दिवसात 50 मीटर वेगानं वाहतात आणि अशाप्रकारे हिमनदी धोकादायक बनतात. त्यांना गॅलोपिंग ग्लेशियर देखील म्हटले जाते. ग्लेशियरचं पाण्यासोबत मिसळणं याला अधिक धोकादायक बनवतं. याला भयंकर स्वरुप येऊन बर्फाचे तुकडे पाण्यावर तरंगायला लागतात. धौली नदीचा पूर इतर पुरांपेक्षा जास्त भयंकर याच कारणामुळे असतो.
ग्लेशियर बर्याच बाबतीत उपयुक्तदेखील असतात. ते गोड्या पाण्याचे खूप मोठे आणि विश्वासार्ह स्त्रोत आहेत. ते अतिशय सुपीक माती (सुपीक माती) देतात असे मानले जाते. नद्यांचा स्रोत म्हणून ते सर्वात उपयुक्त आहेत. गंगा नदीचा मुख्य स्रोत (गंगोत्री ग्लेशियर) स्वतः हिमनदी आहे. हे भारत आणि बांग्लादेशातील शुद्ध पाणी आणि विजेचा मुख्य स्रोत आहे.