सूरत महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं दमदार यश मिळवलं आहे. एकूण 120 जागांपैकी 93 जागांवर भाजपनं आपला झेंडा फडकवला आहे. तर, काँग्रेसला लज्जास्पद पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. आम आदमी पार्टीनंही 27 जागांवर यश मिळवल्यानं एकच आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र, निकाल समोर आल्यानंतर निराश झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध प्रदर्शन केलं आहे. त्यांना कार्यालयाबाहेक जिल्हा आणि शहर अध्यक्षांचे पुतळे जाळले आहेत.