के रॉजर्स यांच्या मुलीने त्या सापाला कार्पेटवर सरपटताना पाहिले तेव्हा, तिला त्या सापाची 2 तोंडं दिसली. तिने त्या सापाचं नाव डॉस ठेवलं आहे. के रॉजर्स यांनी सांगितले की, 'माझ्या मुलीने याबाबत सांगितलं तेव्हा मला वाटलं की ती गंमत करत आहे. जेव्हा मी साप पाहिला तेव्हा मला आश्चर्य वाटलं. मी असा साप कधीच पाहिलं नव्हता.
हा साप दक्षिणेकडील ब्लॅक रेसर प्रजातीचा आहे अशी माहिती, फ्लोरिडा वन्यजीव संरक्षण आयोगाने दिली आहे. या सापाचे फोटो फेसबुकवर शेअर केले. त्यांनी लिहिले की, 'या प्रकारच्या घटनेला बाईसफ्लाय म्हटले जाते, जे असामान्य आहे. हे गर्भाच्या विकासाच्या वेळी उद्भवते. जेव्हा दोन मोनोझिगोटीक जुळे वेगळे होऊ शकत नाहीत तेव्हा शरीराला दोन डोकी असतात.'
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार दोन डोकं असलेल्या या सापाला जंगलांत राहणं फार जातं. कारण दोन मेंदू वेगवेगळे निर्णय घेतात. त्यामुळे शिकार करण्यात अडचणी येतात. त्याच्यासमोर जेवण ठेवताच एक डोके खाण्याच्या दिशेने वाटचाल करतं आणि दुसरे डोके त्याला मागे खेचत असतं.' सध्या दोन डोकी असलेल्या सापांची देखभाल एफडब्ल्यूसी कर्मचार्यांकडून केली जाते.