तुम्हाला जर असं विचारलं गेलं, की वांगयाच्या झाडाला काय येईल? किंवा टोमॅटोच्या झाडाला काय येईल? तर निश्चितच तुमचं उत्तर असेल, की वांग्याच्या झाडाला वांगं आणि टोमॅटोच्या झाडाला टोमॅटो. मात्र, वाराणसीतील भारतीय भाजीपाल संशोधन संस्थेनं संशोधन करुन अशी झाडं तयार केली आहेत, ज्यात एकाच झाडाला विविध प्रकारच्या फळभाज्या येतात.
संस्थानाचे डायरेक्टर डॉ. जगदीश सिंह यांनी सांगितलं, की कलमाचा हा प्रयोग 2013-14मध्ये सुरू झाला. याचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांना होईल. विशेषतः अशा शेतकऱ्यांना ज्यांच्याकडे पावसाळ्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असतं. सध्या या झाडांना शहरातील लोकांसाठी तयार केलं गेलं आहे. ज्यांच्याकडे जागा कमी आहे , मात्र औषध मारलेल्या भाज्यांपासून वाचण्यासाठी जे घरीच रोपं लावतात. तसंच टेरेस गार्डनची हौस असणाऱ्या लोकांसाठी ही झाडं आहेत. लवकरच शहरातील नर्सरीमध्ये ट्रेनिंग देऊन ही झाडं उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.