

पेरूची राजधानी लीमामध्ये एका तरुणीने कोविड-19 नियमांचं उल्लंघन केलं, ज्यानंतर पोलिसांनी तिच्याकडे दंड वसुल करण्याचं सोडून तिला किस करुन सोडून दिलं.


पोलीस कर्मचाऱ्याने केलेला हा प्रकार जवळील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. जो एका टीव्ही चॅनलने शेअर केला आहे.


व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पोलीस कर्मचारी मुलीची माहिती आपल्या नोटपॅडवर लिहित आहे. मात्र यादरम्यान तरुणी कथित माहितीनुसार दंड घेण्याऐवजी किस करण्यास सांगत आहे.


डेलीमेटच्या रिपोर्टनुसार हा प्रकार समोर आल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलं. पेरुची राजधानी लीमाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.


मिराफ्लोरेस जिल्ह्याचे सुरक्षा प्रभारींनी सांगितलं की, हा प्रकार समोर आल्यानंतर महापौरांनी तातडीने त्या अधिकाऱ्याचं निलंबन करण्याचा निर्णय घेतला. ती तरुणी सोशल डिस्टन्सिंगसारख्या कोविड नियमांचं उल्लंघन करीत होती आणि पोलीस कर्मचाऱ्याने तिला असं करण्याची परवानगी दिली. इतकच नाही तर त्याने आपला मास्क काढून तिला किसदेखील केलं.