उत्तर प्रदेशातील शामली गावात दोन वेगवेगळ्या ट्रॅक्टरच्या दोन चालकांनी मातीच्या उंच ढिगाऱ्यावर ट्रॅक्टर चढवण्यासाठी 10 हजार रुपयांची पैज लागली होती. मातीचा ढिगारा इतका उंच होता की कोणताही ट्रॅक्टर तेथे चढू शकला नसता. जेव्हा ट्रॅक्टर मातीच्या ढिगाऱ्यावर चढू शकला नाही तर लोक शेजारी उभे राहून जोर जोरात हसू लाहले. त्यावेळी एक पैज आणि लोकांच्या हसूने तरुणाचा जीव घेतला. या तरुणाला 10000 रुपयांची पैसे जिंकायची होती.
जेव्हा गौरव शर्मा आपला ट्रॅक्टर घेऊन मातीच्या ढिगाऱ्यावर चढण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा अचानक त्याचं ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटले व ट्रॅक्टर मागे जाऊ लागला. त्यावेळी जवळील असलेले लोक गौरववर हसू लागले आणि कमेंट करू लागले. वाईट कमेंट आणि पैजेमुळे त्याचा मृत्यू झाला. ढिगाऱ्यावर ट्रॅक्टर चढवित असताना ट्रॅक्टर मागच्या बाजूला पलटला. ज्यात गौरव 10 हजार रुपयांच्या पैजेबरोबरच जिवनाचं युद्धही हरला.