रिपोर्ट्सनुसार थायलंडच्या राजाकडे 30 अरब डॉलरहून अधिक संपत्ती आहे. राजाच्या जनानखान्याला थायलंडमधून मागवलेल्या सोन्या चांदीच्या वस्तुंनी सजवण्यात आलं आहे. राजाला राजकीय सवलत असल्यामुळे जर्मन सरकार त्यांच्या कुठल्याही कामात हस्तक्षेप करत नाही. कोरोनापासून दूर राजा जर्मनीत 20 सेक्स सोल्जरसोबत आलिशान जगतोय. राजाविरुद्ध बोलणाऱ्याला 15 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो तरीही लोक रस्तांवर उतरून निदर्शनं करत आहेत. थायलंडमध्ये 1932 पासून घटनात्मक राजेशाही आहे. (फोटो - AFP)
राजाचे किस्से अजब-गजब आहेत. 68 वर्षांच्या राजाला सुंदर बायकांचा नाद आहे आणि त्याच्या जनानखान्यात 20 सेक्स सोल्जर आहेत ज्यांना तो आपल्या प्रायव्हेट बॉडीगार्ड म्हणतो. त्याला तीन बायका होत्या आणि एका सेक्स सोल्जरशी त्यानी लग्न केलं. त्यांच्या फूफू या कुत्र्याला त्यानी संपूर्ण राजकीय सन्मानात थायलंडच्या एअरफोर्सचा प्रमुख बनवलं आहे. त्या कुत्र्याच्या गादीसाठी लाखो डॉलर खर्च केले आहेत.
बायकोला जेलमधून बाहेर काढल्यावर तातडीने जर्मनीमधील राजाच्या जनानखान्यात पाठवण्यात आलं आणि एक महिना झाला ती तिथंच आहे. जर्मनीतलं वृत्तपत्र बिल्डच्या म्हणण्यानुसार महा वाचिरालोंगकोंन उर्फ राम दशम दक्षिण जर्मनीतील अल्पाइन हॉटेलमध्ये थांबला आहे. राजा महाने चौथा फ्लोर बुक केला आहे. या हॉटेलात राजाच्या कामवासनातृप्तीसाठी एक विशेष खोली तयार करण्यात आली आहे. (फोटो - AFP)
राजा महा वाचिरालोंगकोंनने 35 वर्षांच्या सिननेत वोंगवाजीरापाकडीशी लग्न केलं होतं. सिननेत वोंगवाजीरापाकडी पहिल्यांदा नर्स होती नंतर थाई आर्मीत हेलिकॉप्टर पायलट झाली. पायलटची नोकरी करतानाच तीन महिन्यांत राजाने सिननेतला लग्नाचा प्रस्ताव दिला पण त्यांच लग्न जास्त दिवस टिकलं नाही आणि त्यानी तिला तुरुंगात टाकलं.राजा वाचिरालोंगकोंनची तीन लग्न झाली असून त्या बायकांपासून त्याला 7 मुलं आहेत. त्या तिन्ही बायकांशी त्याचा घटस्फोट झाला आहे. (फोटो - AFP)