अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू होऊन दोन महिने पूर्ण झालेत. त्याचे चाहते त्याला विसरू शकले नाहीत. त्याच्या आठवणींना उजाळा देणारे त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होऊ लागले आहेत. या व्हिडीओच्या रूपात सुशांतला पाहता येतं, मात्र तरीही त्याचा मेणाचा पुतळा बनवावा अशी मागणी आता होऊ लागली आहे.