ऐकून आश्चर्य वाटेल! या देशात प्रार्थना करताना घेतली जाते दारू, पाहा PHOTOS
या देशातील एका चर्चमध्ये प्रार्थनेदरम्यान दारूची खास मैफिल असते.
|
1/ 7
गणेशोत्सव किंवा सणवाराला आपण प्रसाद म्हणून आपण गुळ-खोबरं, लाडू किंवा शिरा असे गोडधोड पदार्थ देतो किंवा आपल्याकडे अशा पद्धतीचा प्रसाद आपण खाल्ल्याचं आठवतंय पण ऐकून आश्चर्य वाटेल एका देशात प्रार्थनेचा भाग म्हणून दारू घेतली जाते.
2/ 7
या देशातील एका चर्चमध्ये प्रार्थनेदरम्यान दारूची खास मैफिल असते. हा चर्चमध्ये हा प्रार्थनेचा सर्वात महत्त्वाचा भाग समजला जातो. प्रत्येकाला आवडणारी दारू पिण्याची सोय या चर्चमध्ये केली जाते. हे मद्यपान प्रार्थनेचा एक भाग असल्याचं इथे समजलं जातं. (AFP)
3/ 7
दक्षिण आफ्रिकेलील booze नावाच्या चर्चमध्ये ही खास प्रथा आहे. AFPने दिलेल्या माहितीनुसार हे चर्च दक्षिण आफ्रिकेच्या टेवरेन इथे आहे. दक्षिण आफ्रिकेची राजधानी जोहानिसबर्गपासून 50 किमी दूर अंतरावर हे चर्च आहे. (AFP)
4/ 7
या चर्चची स्थापना 2017 मध्ये 54 वर्षांच्या त्सेसी मकिती यांनी केली. युरोपीयन कल्चरलला रिजेक्ट करून असं काहीतरी सुरू केलं पाहिजे ज्यामुळे समाज एकत्र येईल. यासाठी त्यांनी प्रार्थनेदरम्यान मदिरा घेण्याचा परंपरा सुरू केली. (AFP)
5/ 7
मकिती यांच्या म्हणण्यानुसार लोक पबमध्ये जाऊ दारू सेवान करतात आणि मन हलकं करतात आनंदी होतात. चर्चमध्ये लोकांना मद्य सेवन करून आनंद साजरा करता येणार आहे. इथले लोक देवाच्या भक्तीसोबतच या गोष्टी करू शकतील या उद्देशानं चर्चची स्थापना करण्यात आली आहे. (AFP)
6/ 7
मकिती यांच्या म्हणण्यानुसार समुद्रात जिथं मासे जाळ्यात अडकण्याची आशा आहे अशाच ठिकाणी जाळं टाकायला हवं अशी शिकवण जीजसने दिली आहे. मी पण तेच करत आहे. माझ्या या चर्चमध्ये असे लोक येतात ज्यांनी इतर चर्चमध्ये जाणं बंद केलं किंवा त्यांना जाणं पसंत नाही. (AFP)
7/ 7
जास्त दारू पिणं शरीरासाठी हानिकारक आहे. असं मकितीही म्हणतात. त्यामुळे केवळ मद्यपान कऱण्यासाठीच नाही तर इथे लोक प्रार्थना करण्यासाठीही येतात. मद्यपान हा प्रार्थनेचा एक भाग असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या चर्चमधील अजब परंपरेची मात्र जगभरात चर्चा होत आहे. (AFP)