आई होण्याची चाहूल लागणं हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील अनमोल असा क्षण असतो. मात्र यादरम्यान महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. त्याच्या परिणाम त्यांच्या त्वचेवरही होतो.
2/ 14
बहुतेक स्त्रियांना डोळ्याभोवती काळी वर्तुळे, पिग्मेंटेशन, त्वचेवर चट्टे पडणे, मुरुम उठणे, व्हेरीकोज व्हेन्स, अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून झालेल्या गाठी, भेगा पडलेल्या टाचा, ओठ फाटणं अशा अनेक समस्या उद्भवतात.
3/ 14
काही स्त्रियांना ओटीपोटात आणि मांडी तसंच त्याच्या आसपास त्वचेवर खाज सुटते किंवा लाल रंगाचे पुरळ उठू शकतात.
4/ 14
गर्भारपणात महिलांनी स्वतःच्या त्वचेची काळजी घेतल्यास या समस्या टाळता येऊ शकतात. यासाठी त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
5/ 14
प्रेग्नन्सीत त्वचेची काळजी कशी घ्यावी, याबाबत द एस्थेटिक क्लिनिक्सच्या त्वचारोग सल्लागार आणि कॉस्मेटिक त्वचारोग तज्ज्ञ डॉ. रिंकी कपूर यांनी सल्ला दिला आहे.
6/ 14
घराबाहेर पडताना प्रत्येक वेळी सनस्क्रीनचा वापर करा तसंच उन्हापासून संरक्षण करण्यासाठी छत्री तसंच टोपीचा वापर करावा.
7/ 14
सॅलिसिलिक अॅसिड किंवा रेटिनोइड, आयसोट्रेटीनोईन आणि ओरल टेट्रासाइक्लिन असलेली उत्पादनं वापरू नका कारण यामुळे बाळामध्ये जन्मदोष उद्भवू शकतात.
8/ 14
मुरुमांवर उपचार करण्यासाठी टॉपिकल बेन्झॉयल पेरॉक्साईड, अझेलिक अॅसिड आणि ग्लाइकोलिक अॅसिड असलेली ओटीसी उत्पादनं वापरू शकता. मात्र त्याआधीही त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
9/ 14
मेकअप आणि त्वचेकरिता वापरली जाणारी उत्पादनं सुंगंध विरहित असणं गरजेचं आहे.
10/ 14
झोपायच्या आधी दररोज न चुकता आपला मेकअप काढणं आवश्यक आहे.
11/ 14
दिवसातून दोनदा कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा, त्वचेला मॉईश्चराईज करा