सुशांत सिंह रजपूतच्या आत्महत्येनंतर रियाने एका चित्रासंदर्भात माहिती दिली होती. हे चित्र युरोप ट्रिपदरम्यान सुशांतनं पाहिलं होतं. त्यानंतर त्याचं वागणं बदलल्याचंही रियानं सांगितलं. जगात अशी काही निवडक चित्र आहेत जी पाहिल्यानंतर बऱ्याचदा आपलं मन विचलित करू शकतात किंवा विचित्र वागण्यास भाग पडता अशा चित्रांचं रहस्य आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
युक्रेनच्या कलाकार स्वेतलाना टेल्टिजने अशी बरीच चित्रे तयार केली ज्याचं जगभरात खूप कौतुक झालं पण एक चित्र मात्र सर्वात जास्त चर्चेत राहिलं. 'रेन वूमन' ह्या कलाकृतीमध्ये पावसात एक महिला भिजत असल्याचं दिसत आहे. काळा, पांढरा आणि हिरव्या रंगाचा या चित्रात वापर करण्यात आला आहे. अवघ्या 5 तासांत हे चित्र रेखाटल्याचंही सांगितलं जातं. हे चित्र अनेकांनी मोठ्या किंमतीला खरेदी केलं मात्र काही तासांत पुन्हा परत केलं. हे चित्र घरात आणल्यानं उदासिनता वाटते, पॅरानॉमल अॅक्टिव्हिटी घडत असल्याचा दावाही अनेकांनी केला आहे.
Love Letters Replica या नावाची कलाकृतीही अनेकांच्या मनात भीतीचं घर करून गेली. या चित्रात एक लहान मुलगी हातात गुलाबाची फूट घेऊन उभी आहे. तर दुसऱ्या हातात पाकिट पकडलं आहे. हा चित्रामागे एक सत्य कहाणी दडली असल्याचंही सांगितलं जातं. या पेंटिंगकडे सलग एक मिनिटं पाहिल्यानंतर यातली मुलगी चेहऱ्यावरचे भाव बदलते असा अनेकांनी दावा केला होता.
इटलीचा कलाकार ब्रूनो एमेडियो याने हे काढलेलं चित्र आहे. दुसऱ्या जागतिक युद्धादरम्यान हे चित्र काढण्यात आल्याचं सांगितलं जातं. The Crying Boy नावाचं पेंटिंग मात्र आजही कुतूहलाचा विषय आहे. हे चित्र ठेवणाऱ्यासोबत अनेक संकट आणि विचित्र घटना घडू लागल्या त्यानंतर हे चित्र लोक चित्रकाराला परत करू लागले.
The Anguished Man सगळ्यात भयावह असं हे चित्र म्हटलं जातं. जगाला घाबरवणाऱ्या भुताचं चित्र...हे कोणी काढलं हे अद्याप समजू शकलं नाही पण हे रक्तानं काढलेलं चित्र असल्याची चर्चा आहे. सीन रॉबिन्सन नावाच्या व्यक्तीला हे चित्र आजीच्या बॅगेत मिळालं. या चित्रामागचं रहस्य ज्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासोबत वाईट अनुभव आल्याचं अनेकांनी सांगितलं आहे.