बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचं मन्नत खूपच आलिशान आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का त्याची व्हॅनिटी व्हॅन सुद्धा एखाद्या मोठ्या आलिशान बंगल्यापेक्षा कमी नाही. ऐसपैस मोठी जागा, लॉन इत्यादी गोष्टींनी सुसज्ज असलेल्या शाहरुखच्या या व्हॅनिटी व्हॅनचे चाहते अनेक बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सुद्धा आहेत.
2/ 5
या व्हॅनिटीचं फरशी पूर्णपणे काचेची आहे, ज्यामध्ये एलईडी लाइट्स आहेत. यामध्ये एक्स्टेन्शनची सोय आहे. म्हणजे एका बाजूने वाढवल्यानंतर ही एक मोठी रूमच वाटते.
3/ 5
यामध्ये पँट्री, वॉर्डरोब, खास मेकअप चेअर, स्वतंत्र टॉयलेट आणि शॉवरही आहे. व्हॅनिटीमधील पडदे, लाइट अशा अनेक गोष्टी आयपॅडवरून कंट्रोल होतात.
4/ 5
व्हॅनमध्ये एक मोठा असा फ्लॅट स्क्रिन टीव्हीदेखील आहे. शिवाय आवश्यक सोयीसुविधांयुक्त असं मिनी किचनही आहे.
5/ 5
व्हॅनिटीमध्ये इलेक्ट्रिक चेअर आहेत, ज्यावर पुश बटण आहे. हे बटण दाबताच खुर्ची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते.