रशियाची Sputnik V कोरोना लस तयार; कधी आणि किती किमतीत मिळणार पाहा
जगभरातील कोरोना लशींच्या (corona vaccine) शर्यतीत रशियाने (russia) बाजी मारली आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने कोरोना लशीला मंजुरी दिली आहे.
|
1/ 8
रशियाने आपल्याला लशीला स्पुतनिक व्ही (Sputnik V) असं नाव दिलं आहे. मॉस्कोतल्या गमालिया इन्स्टिट्युन ऑफ एपिडेमिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीनेही ही लस तयार केली आहे.
2/ 8
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आपल्या मुलीला कोरोनाची पहिली लस दिली आहे.
3/ 8
2 महिन्यांत या लशीचं क्लिनिकल ट्रायल करण्यात आलं आहे. मुख्य म्हणजे क्लिनकल ट्रायलदरम्यान संशोधकांनी आणि शास्त्रज्ञांनी या लसीचा स्वत:वर प्रयोग केला होता.
4/ 8
अॅडेनोव्हायरसला बेस बनवून ही लस तयार केली आहे. या लसीमध्ये वापरलेले पार्टिकल्स स्वत: ची रेप्लिकेट (प्रतिकृती) बनवू शकत नाहीत, उलट अँटिबॉडी तयार होईल जी शरीरात व्हायरसचा हल्ला झाल्यावर सक्रिय होईल, असा दावा संशोधकांनी केला आहे.
5/ 8
सप्टेंबरपासून या लशीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं जाणार आहे. रशिया आपल्या देशातील आरोग्य कर्मचारी, शिक्षक आणि वयस्कर व्यक्तींना ही लस सर्वात आधी देणार आहे.
6/ 8
20 देशांनी या लशीच्या अब्जावधी डोसची आधीच ऑर्डर दिली आहे, असं रशियाने सांगितलं आहे.
7/ 8
रशियन वृत्तसंस्था TASS च्या मते, रशियामध्ये ही लस मोफत दिली जाणार आहे. तर इतर देशांसाठी याची किंमत किती असेल याबाबत अद्याप सांगितलेलं नाही.
8/ 8
या लशीच्या क्लिनिकल ट्रायलया शेवटचा टप्पा अद्याप पूर्ण झालेला नाही, त्यामुळे लशीच्या सुरक्षिततेबाबत जागतिक आरोग्य संघटनेसह अनेक तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.