मुंबई आणि शिमलामध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर रतन टाटा (Ratan Tata) यांनी 1955 मध्ये न्यूयॉर्क शहर (New York City) मधील रिवरडेल कंट्री स्कूल (Riverdale Country School) मधून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. गुरुवारी 82 वर्षीय रतन टाटा (Ratan Tata) यांनी #ThrowbackThursday हैशटेग सह आपल्या शाळेतील काही फोटो शेअर केले.
वार्षिक पुस्तकात लिहिलं आहे की, - रतन टाटा भारतातून येथे आले. येथे त्यांचे अनेक मित्र झाले आहेत. आणि अवघ्या दीड वर्षे राहून ते अमेरिकन झाले आहेत. या लेखावरुन असं दिसतं की रतन टाटा यांनी एकदा इंजिनिअर होण्याची इच्छा व्यक्त केली आणि शाळेत ते बेसबॉल खेळात असे. आपल्या भारतातील शाळेची तुलना करता रतन टाटा यांनी रिवरडेल ही अत्यंत कडक शाळा असल्याचे सांगितले.