

रायगडच्या पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात 800 फूट खोल दरीत बस कोसळून 33 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. आंबेनळी घाटात ही बस जवळपास 8०० फूट खोल दरीत कोसळली.


दरीतून मृतदेह काढण्यासाठी ट्रेकर्सनी दोरखंड सोडण्यात आलाय. त्या आधारे दरीतून मृतदेह बाहेर काढण्यात येत आहे.


आंबेनळी घाटात बस दरीत कोसळून 33 जणांचा मृत्यू झाला. मृतदेह बाहेर काढण्याचे कार्य सुरू आहे. 12 मृतदेह हे पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आली. पोस्टमार्टेम करून सहा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आली. यावेळी रुग्णालयाच्या परिसरात मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावून टाकणार होता


दुपारच्या सुमारास घटनास्थळी क्रेनही मागवण्यात आली. क्रेनच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्याचे कार्य सुरू आहे.


क्रेनच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्याचे कार्य सुरू आहे. यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं मदतीसाठी पुढे आले