...जेव्हा राफेल भारतात पोहोचले, प्रत्येक भारतीयांची मान उंचावणारे PHOTOS
आजचा दिवस भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा असाच आहे. भारतीय हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी खास असे सुपर फायटर राफेल विमानं अखेर भारताच्या हवाई क्षेत्रात दाखल झाले आहे.
आजचा दिवस भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा असाच आहे. भारतीय हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी खास असे सुपर फायटर राफेल विमान अखेर भारताच्या हवाई क्षेत्रात दाखल झाले आहे.
2/ 8
आज दुपारी पाचही फायटर राफेल विमानं भारतीय हवाई क्षेत्रात पोहोचल्यावर वायु दलाने एकच जल्लोष केला.
3/ 8
'राफेल फायर जेटचं भारतीय आकाशातच वायूदलाने जंगी स्वागत केले.
4/ 8
2 सुखोई MIK 30 फायटर जेटनी, 5 राफेल फायटर जेटना एस्काॅर्ट करत अंबाला एअर बेसकडे रवाना झाले.
5/ 8
राफेल विमानाची पहिली तुकडी जेव्हा भारतीय हवाई हद्दी पोहोचली तेव्हा भारतीय नौदलानेही विजयी सलामी देऊन स्वागत केले.
6/ 8
यूएईच्या अल धफ्रा बेसवरुन उड्डाण केल्यानंतर राफेलच्या तुकडीने पश्चिम अरबी सागरात तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या INS कोलकात्ता या युद्धनौकेतील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला.
7/ 8
भारतीय नौदलाच्या INS कोलकात्ता या युद्धनौकेनं या विमानाचं अशा पद्धतीने जल्लोषात स्वागत केले
8/ 8
तीन लढाऊ तर दोन प्रशिक्षित अशा 5 राफेल विमानांची पहिली तुकडी आज भारतात पोहोचली आहे. 27 जुलै रोजी फ्रान्सच्या मेरिग्नाक एअरबेसवरून ही 5 विमान भारताच्या दिशेनं रवाना झाली होती.