कोरोना विषाणूची लागण देशभरात होत असताना आणि बिहार विधानसभा निवडणूक सुरू होत असताना बिहारमधील वृत्तपत्रांच्या पहिल्या पानांवरील एका जाहिरातीनी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. या जाहिरातीत एक तरूणी दिसून आली जिचे नाव आहे पुष्पम प्रिया चौधरी. जिच्या नावाखाली मुख्यमंत्रिपदाची उमेदवार 2020 असं लिहीलं होतं. या जाहिरातीमुळे बिहार विधानसभा निवडणुकीची चर्चा काही महिने आधीच सुरू झाली होती. यातच मार्चच्या अखेरीस लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. यामुळे सर्व कार्यक्रम बंद झाले आणि कोरोनामुळे पुष्पम प्रिया लगेचच गायब झाली.
बिहार निवडणुकीतही उत्सुक असलेल्या पुष्पम प्रियाच्या काळे कपडे घालण्याबाबत जेव्हा प्रश्न उपस्थित केले तेव्हा तिने नितीश कुमार यांच्या पांढरे कपडे घालण्याबाबत टीका केली. पुष्पम प्रिया हिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. तसंच अधिकाधिक शिकायला आणि अनुभव घ्यायला ती बिहारमध्ये आली आहे.