नवी दिल्ली 18 मे : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ पुन्हा एकदा वाईट कारणामुळे चर्चेत आला आहे. एका ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूवर लहान मुलांवर लैंगिक अत्याचार (Aaron Summers Child Sexual Offence) केल्याचा गंभीर आरोप आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा वेगवान गोलंदाज अॅरॉन समर्स याला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली आणि सोमवारी त्याला डार्विन कोर्टात हजर करण्यात आले.