कोरोना पॉझिटिव्ह मुलांना का बळावतोय PMIS आजार; तज्ज्ञांना सापडलं उत्तर
मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह मुलांना PMIS आजार बळावल्याचं दिसून आलं आहे.
|
1/ 9
जगभरात कोरोनाची लागण झालेल्या लहान मुलांमध्ये कोरोनाची सर्वसामान्य लक्षणं न दिसता इतर लक्षणं दिसत आहे. कोरोना पॉझिटिव्ह मुलांना कोरोनासंंबधी इतर आजार झाल्याची अनेक प्रकरणं पाहायला मिळाली आहे.
2/ 9
सुरुवातीला लंडन आणि युरोपमधील इतर काही देशांमध्ये लहान मुलांमध्ये कावासाकीसारख्या आजाराची लक्षणं दिसली. त्यानंतर मुंबईतील कोरोनाग्रस्त मुलांमध्येही अशीच लक्षणं दिसून आला.
3/ 9
हा आजार म्हणजे पिडियाट्रिक इन्फ्लेमेटरी मल्टीसिस्टम सिंड्रोम (Paediatric Multisystem Inflammatory Syndrome).
4/ 9
पीआयएमएस-टीएस हा कोरोनाशी संबंधित आजार आहे, ज्याची लक्षणं कावासाकी आजारासारखीच आहेत.
5/ 9
पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना हा आजार होतो. या आजारात रक्तवाहिन्यांना सूज येते.
6/ 9
ताप, त्वचेवर पुरळ, डोळ्यांची जळजळ, पोटातील विकार अशी या आजाराची लक्षणं आहेत.
7/ 9
संशोधकांनी कोरोना लॉकडाऊन दरम्यान बर्मिंघम चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या या आजाराने पीडित मुलांच्या रक्ताचे नमुने तपासले.
8/ 9
मोनोसाइट्समधील बदलामुळे हा आजार होत असल्याचं संशोधकांना दिसून आलं. मोनोसाइट्स हा रोगप्रतिकारक पांढऱ्या रक्तपेशींचा एक प्रकार आहे.
9/ 9
संशोधनाचे अभ्यास ग्राहम ट्रेलर म्हणाले, कावासाकी आजार आणि पीआईएमएस-टीएस दोघांचा संबंध मोनोसाइट्सच्या संख्येत मोठ्या प्रमाणात बदल आणि त्यांच्या आनुवंशिक आकृतीशी आहे, याचा खुलासा पहिल्यांदाच आमच्या अभ्यासात झाला.