

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील राममंदिराचं भूमिपूजन झालं. यानंतर मोदींनी त्याठिकाणी पारिजातकाचं रोपही लावलं. (PHOTO - ANI)


पारिजातक ज्याला पारिजात किंवा प्राजक्ताची फुलंही म्हटली जातात. अनेक कवितांमध्ये आपण याचा उल्लेख ऐकला आहे. पारिजातकाचा सुगंध खूप मनमोहक असतो. (PHOTO - ANI)


पारिजातकाचं झाड 10-15 फूट उंच असतं. काही वेळा ते 30 फूट उंचदेखील वाढतं. यावर भरपूर प्रमाणात फुलं येतात.


पारिजातकाला पवित्र वृक्ष मानलं जातं. हिंदू धर्मात देवाच्या पूजेत याला महत्त्वाचं स्थान आहे. शिवाय या झाडाचं फूल, पाने आणि फांद्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. (PHOTO - ANI)


मूळव्याधावर हे रामबाण असं औषध मानलं जातं. याशिवाय प्राजक्ताचं फूल हृदयासाठीही फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं.


पारिजातकाची पाने वाटून त्वचेवर लावल्यास त्वचेसंबंधी समस्या बऱ्या होतात. या पानांपासून तयार केलेलं हर्बल तेलही त्वचेच्या आजारात भरपूर प्रमाणात वापरलं जातं. (PHOTO - ANI)


याशिवाय या पानांच्या रसात मध मिसळून प्यायल्यास कोरडा खोकला बरा होतो. तसंच या पानांचा रस तापावरही फायदेशीर आहे. (PHOTO - ANI)