एकता कपूरच्या 'नागिन 3'मध्ये काम करणारी सुरभी हल्ली खूप चर्चेत आहे. याची दोन कारणं आहेत.कलर्सवरची ही मालिका सध्या नंबर वनला पोचलीय आणि त्यातली सुरभीची बेला लोकांना आवडतेय. पर्ल पुरी आणि सुरभीची जोडी टीव्हीवरची नंबर 1 जोडी बनलीय. एरवी साडी, कुंकू, बांगड्या असा पारंपारिक पोशाख घालणाऱ्या सुरभीनं सोशल मीडियावर तिचे हाॅट फोटोज शेअर केलेत. सुरभीचे हाॅट फोटोज सध्या व्हायरल होतायत. सुरभीची ही वाढलेली लोकप्रियता नागिन 3ला फायदा मिळवून देईल, हे नक्की.