मुजीब शेख, नांदेड,27 जुलै : मराठा आंदोलनामुळे राज्यभरात भडका उडाला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाता बाहेर जाऊ नये म्हणून महाराष्ट्र पोलीस चोवीस तास डोळ्यात तेल घालून पहारा देत आहे. पण तरीही कुठे पोलिसांवर दगडफेक होते तर कुठे बुट मारला जात आहेत. पण राज्याचं रक्षण करणाऱ्या या महाराष्ट्र पोलिसाच्या वर्दीतील आईही लपून राहू शकली नाही...आपल्या लेकरासाठी अशाही परिस्थितीत या माता आपल्या लेकराला सोबत घेऊन कर्तव्य बजावत आहे.