मावळ तालुक्यातील धामणे गावात राहणाऱ्या ज्ञानेश्वर गराडे यांच्या कुटुंबीयांनी 18 वर्षांपूर्वी सहा महिन्याचा बैल सांभाळण्यासाठी आणला घरची जेमतेम परिस्थिती मोठं कुटुंब, परंतु, जनावरांचे आवड असणाऱ्या गराडे यांनी पोटच्या मुलाप्रमाणे बैलाचा सांभाळ केला. प्रेमाने त्याचे नाव कबीऱ्या ठेवले. जसजसे दिवस सरत गेले तस तसा कधी शेताच्या नांगरणी ला तर कधी मालकाची पत राखण्याकरता कबीऱ्या गाव जत्रेत होणाऱ्या बैलगाडा शर्यतीत घाटात जीव तोडून धाऊ लागला.
मावळ ,मुळशी, खेड या तालुक्यात होणाऱ्या बैलगाडा शर्यतीत अगदी कमी वेळात धावण्याचे कबीऱ्याने अनेक विक्रम केले. त्यामुळे पंचक्रोशीत ज्ञानेश्वर गराडे यांच्या नावापुढे प्रसिद्ध गाडामालक हे विश्लेषण लागले. तालुक्यात होणाऱ्या प्रत्येक बैलगाडा शर्यतीत घाटाचा राजा तसेच फायनल सम्राट म्हणून कबिऱ्याने फ्रिज ,टीव्ही, दुचाकी सारखी अनेक बक्षिसे मिळविली
पाच वर्षांपूर्वी प्राणिमित्र संघटनेने बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली त्यानंतर बैलांच्या रुबाबाला उतरती कळा लागली घाटात वाऱ्याच्या वेगाहुन अधिक गतीने धावणारा कबीऱ्या खुंटीला बांधू जाऊ लागला. धावण्याच्या सरावा अभावी त्याला अनेक आजारांनी ग्रासले. परंतु, गाडा मालकाने त्याच्या इलाजात कुठलेही कसर ठेवली नाही. दर्जेदार उपचार करूनही शेवटी कबीऱ्याने मालकाची साथ सोडली.