कोकणात प्रचंड पाऊस असतो. यावर्षी मान्सून वेळेत असल्याने लवकरच पावसाला सुरूवात होणार आहे. त्याआधी पुन्हा घरं उभारण्याचं आव्हान इथल्या लोकांसमोर आहे.
|
1/ 8
निसर्ग चक्रीवादळाने कोकणातल्या काही जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला आहे. रायगड, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी तालुक्याला निसर्गने झोडपून काढलं.
2/ 8
रत्नागिरी जिल्ह्यात गावंच्या गावं उघड्यावर पडली असून शेकडो संसार विस्कटले आहेत.
3/ 8
दोपोली तालुक्यात मुरूड, वेळास, केळशी आणि अनेक गावांच प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर संसार कसा उभा करायचा असा प्रश्न लोकांना पडलाय.
4/ 8
पावसाने घरं पडली, जोरदार वाऱ्याने छपरं उडाली त्यामुळे लोकांना गेली काही दिवस उघड्यावर काढावी लागत आहेत.
5/ 8
कोकणात घराच्या अंगणात असलेली नारळ पोफळी, अंबा, फणस, काजूची झाडं ही घरातले एक सदस्यच असतात. अशी लहानपणापासून वाढवलेली अनेक झाडं काही मिनिटांमध्ये उन्मळून पडली.
6/ 8
गावंच्या गावं उद्धवस्त झाल्याने शेकडो नागरीक उघडयावर असून कोरोनामुळे त्यांच्यात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
7/ 8
कोकणात प्रचंड पाऊस असतो. यावर्षी मान्सून वेळेत असल्याने लवकरच पावसाला सुरूवात होणार आहे. त्याआधी पुन्हा घरं उभारण्याचं आव्हान इथल्या लोकांसमोर आहे.
8/ 8
नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत करावी अशी मागणी लोकांनी केली आहे.