मारुती सुझुकीच्या Maruti Suzuki बजेट रेंज ऑल्टोचं नवं प्रीमियम मॉडेल लॉन्च होणार आहे. नवी ऑल्टो Maruti Alto डिसेंबर 2020 मध्ये डेब्यू करणार आहे. भारतात ही कार पुढील वर्षी लॉन्च होऊ शकते. ऑल्टो Alto भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक आहे. सध्या असलेल्या ऑल्टोच्या तुलने नवी ऑल्टो अधिक लांबीला असू शकते. (फोटो: मनीकंट्रोल) नव्या ऑल्टोमध्ये नवीन डिझाइनचं ग्रिल असू शकतो. त्याशिवाय, कारमध्ये अपडेटेड बंपर आणि रिवाइज्ड हेडलँप्स दिले जाऊ शकतात. नवी ऑल्टो नव्या डिझाइन व्हिल्स, अपडेटेड टेललँप्स आणि बंपरसह असू शकते. हॅचबॅकच्या हायर वेरिएंटमध्ये टचस्क्रिन इंफोटेनमेंट सिस्टम असू शकतं. नेक्स्ट जनरेशन ऑल्टो नव्या Heartect प्लॅटफॉर्मवर आधारित असू शकते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, अल्ट्रा आणि ऍडव्हान्स हाय स्ट्रेन्थ स्टील्सचा वापर करत या मॉडेलचं डिझाइन करण्यात आलं आहे. (फोटो न्यूज18) कॉस्मेटिक चेंज, फीचर अपग्रेड्स आणि नव्या प्लॅटफॉर्मसह 2021 मध्ये मारुती ऑल्टोच्या किंमतीत काहीशी वाढ पाहायला मिळू शकते. सध्या हॅचबॅक मॉडेल लाईनअपची रेंज 2.94 लाख ते 4.36 लाख रुपयांपर्यंत असू शकते. या एक्स शोरुम किंमती आहेत. (फोटो न्यूज18) जपानमध्ये नेक्स्ट जनरेशन सुझुकी ऑल्टो नव्या R06D 658cc इंजिनसह येईल. हे इंजिन 68bhp पॉवर जनरेट करेल. हॅचबॅकचं स्पोर्टी व्हर्जनही येणार असून त्यात टर्बोचार्ज्ड इंजिन असेल. तर 2021 मध्ये मारुती सुझुकी ऑल्टो 796cc नॅचरली ऐस्पिरेटेज पेट्रोल इंजिनसह येऊ शकते. कार मॅन्युअल आणि AMT गियरबॉक्स ऑप्शनमध्ये असणार आहे. (फोटो न्यूज18) नव्या Heartect प्लॅटफॉर्ममुळे नवी ऑल्टो, सध्याच्या ऑल्टोच्या तुलनेत अधिक सुरक्षित असू शकते.