

अभिजीत श्वेताचंद्र आणि नुपूर दैठणकर हे नवे चेहरे मालिकेत आहेत. निर्माता-दिग्दर्शक संतोष कोल्हेंना मालिकेला पूर्ण वेळ देणारे कलाकार हवे होते.


ही मालिका करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्ही केली ती म्हणजे सर्व भाग आधी लिहून घेतले. त्यानंतर सिनेमाच्या पद्धतीने त्या त्या लोकेशन वर जाऊन त्याचं चित्रीकरण आम्ही केलं. प्रक्षेपित होण्याआधी मालिकेचं नव्वद टक्के चित्रीकरण आम्ही पूर्ण केलं आहे, संतोष कोल्हे सांगतात.


मालिकेला सत्यघटनेची फक्त पार्श्वभूमी आहे. तरीही 1774चा काळ उभा करणं खूप महत्त्वाचं होतं. त्या काळाला अनुसरून वेशभूषा करणंही गरजेचं होतं.


सातारा, सासवड,भोर,फलटण या परिसरात अजूनही पेशवाईतल्या खुणा असणारे वाडे आणि वसाहती आहेत.तिथल्या रिअल लोकेशन वर जाऊन त्यात फेरफार करुन या मालिकेचं चित्रीकरण केलं आहे.


काळ उभा करण्याचं आवाहन होतंच पण हिरोच्या स्टंटसना ग्राफिक्सच्या मदतीनं आम्ही अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न केला आहे, दिग्दर्शक सांगतात.