फतेहाबाद: दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात जवळपास 15 दिवस सहभाग नोंदवल्यानंतर लग्नाची तारीख जवळ आल्याने फतेहाबाद येथे घरी येवून शेतकरी पुत्राने एका वेगळ्या स्टाईलने लग्न केलं आहे. कंवरपाल सिंह असं या व्यक्तीचं नाव असून त्याने शेतकरी शैलीत ट्रॅक्टरमध्ये बसवून आपल्या पत्नीला घरी आणलं आहे. यासाठी त्याने आपली होणारी बायको मनिंदर आणि इतर नातेवाईकांची परवानगी घेतली होती.
यावेळी कंवरपाल सिंह याने सांगितलं की, त्याने दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासाठी तिथे जवळपास पंधरा दिवस राहिला आहे. पण सध्या लग्नाच्या कारणामुळे परत यावं लागलं आहे. पण आंदोलनापासून लांब राहूनही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अशाप्रकारे लग्न केलं आहे. यावेळी त्याने लग्जरी गाडीऐवजी ट्रॅक्टरवर बसवून नवरीला घरी आणलं आहे.