maldivesया देशाचं नाव मालदीव आहे. याचे समुद्रकिनारे जगभरात लक्जरी बिचेसमध्ये गणले जातात. ते अत्यंत सुंदर असे आहेत. समुद्राचं निळं पाणी आणि भव्य रिसोर्ट्स पाहून पर्यटकांचं आकर्षण वाढत आहे. मात्र मिळालेल्या काही रिपोट्सनुसार मालदीवचं 80 टक्के भाग समुद्रस्तराच्या अगदी जवळ आले आहे. बीबीसीमध्ये आलेल्या या बातमीनुसार 1200 च्या जवळपास अशी बेटं आहेत, जी पाण्यात..समुद्रात विलिन होऊ शकतात.
maldivesवातावरणात झालेल्या बदलांमुळे जगभरात समुद्रातील पाण्याचा स्तर वाढत आहे. परिणामी मालदीवच्या बेटाचा स्तर खालावत जात आहे. यापूर्वी 2008 मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीन यांनी सांगितले होते की, ते दुसऱ्या ठिकाणी जमीन खरेदी करण्याची योजना तयार करीत आहेत. त्यामुळे बुडण्याच्या परिस्थितीत देशातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येऊ शकेल.