महाराष्ट्रातील काँग्रेस आमदार जयपूरमध्ये जिथे राहिले 'त्या' अलिशान हॉटेलचे 10 PHOTO
महाराष्ट्रात सत्ता संघर्षाचा पेच कायम आहे. दरम्यान आमदारांच्या फोडाफोडीचं राजकारण होऊ नये यासाठी राज्यातील काँग्रेसच्या सर्व आमदारांना जयपूर इथे ठेवण्यात आलं होतं. जयपूरमधील एका अलिशान हॉटेलमध्ये 6 दिवस इथे राहात होतं. हे हॉटेल आहे तरी कसं आणि या हॉटेलचा खर्च तुम्हाला माहीत आहे का?


सोनिया गांधीच्या आदेशानुसार जयपूरमध्ये ज्या हॉटेलमध्ये काँग्रेसच्या आमदारांना ठेवण्यात आलं त्याचा प्रत्येक दिवसाचा खर्च साधारण 60 ते 70 लाख रुपये एवढा होता. (प्रतिकात्मक फोटो)


या रिसॉर्टमधील खासगी विला भाड्यानं घ्यायचा झाला तरीही साधारण 18 हजारांपासून एक लाखांपर्यंत खर्च येतो. (प्रतिकात्मक फोटो)


माध्यमांनी दिलेल्या अहवालानुसार काँग्रेस आमदार जिथे राहात होते. त्या खासगी हॉटेलचा खर्च रोज साधारण 26 हजार रुपये एवढा होता. (प्रतिकात्मक फोटो)


भाड्यानं घेण्याव्यतिरिक्त खाण्या-पिण्याचा आणि फिरण्याचा खर्च वेगळा. इथे विशेष सुरक्षा व्यवस्था हवी असल्यास लाखो रुपये खर्च करावे लागतात. (प्रतिकात्मक फोटो)


काँग्रेस आमदारांना ज्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. ते हॉटेल जयपूर-दिल्ला मार्गावर आहे. (प्रतिकात्मक फोटो)


सत्ता संघर्षाबाबत राजकारणातील सर्व अप़डेट्स हे आमदार सुरुवातीचे 4 दिवस फक्त हॉटेलमधील रुमवर बसून पाहात होते. (प्रतिकात्मक फोटो)4 दिवस बाहेर येण्यास मनाई करण्यात आली होती.


आमदारांना भेटण्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह इतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्यांना भेटण्यासाठी गेले होते. (प्रतिकात्मक फोटो)


एका संध्याकाळी मुख्यमंत्री गहलोत यांनी त्यांच्या निवसस्थानी खास डिनरसाठी बोलवलं होतं. (प्रतिकात्मक फोटो)


महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर या आमदारांनी रिसॉर्टबाहेर फिरण्यास सुरुवात केली. (प्रतिकात्मक फोटो)


काही आमदारांनी जयपूरमधील आमेर किल्ला पाहण्यासाठी गेले होते. काहींनी खरेदी केली. काही काँग्रेसचे आमदार धार्मिक पर्यटनासाठी मंदिरांमध्ये गेले होते. (प्रतिकात्मक फोटो)


घोडेबाजाराच्या भीतीनं जयपूरमध्ये असणाऱ्या काँग्रेस आमदारांना पुरवली जाणारी सुरक्षा व्यवस्थाही चोख ठेवण्यात आली होती. (प्रतिकात्मक फोटो)