तुमची झोप नाही पूर्ण; वेळीच ओळखा अपुऱ्या झोपेची लक्षणं
पुरेशी झोप (sleep) न मिळाल्यास त्याचा परिणाम शरीरावर दिसून येतो.
|
1/ 6
किमान 8 तासांची पुरेशी झोप गरजेची आहे आणि झोप अपुरी असल्यास शरीर संकेत देऊ लागतं.
2/ 6
झोप पूर्ण झाली नसेल तर डोळ्यांवर परिणाम दिसतो. डोळे लाल होणे, सूजणे, डोळ्यातून पाणी येणं, डोळ्यांखालील त्वचा सुरकुते ही अपुऱ्या झोपेची लक्षणं आहेत.
3/ 6
पुरेशी झोप न मिळाल्याने हार्मोन्सवर परिणाम होतो आणि भूक जास्त लागते. तुम्ही जास्त खाता परिणामी वजन वाढतं. वाढतं वजन अपुऱ्या झोपेचं लक्षण आहे.
4/ 6
झोप पूर्ण न झाल्याने थकवा जाणवतो आणि झटपट असे पदार्थ खाण्याकडे आपला कल असतो. झोप अपुरी असेल तर सकाळी जंक फूड खाण्याची इच्छा होते. सकाळी चीज बर्गर, फ्राईज असे पदार्थ खावेसे वाटत असतील तर हे अपुऱ्या झोपेचे लक्षण आहे.
5/ 6
तुम्हाला सतत कॉफी प्यावीशी वाटत असेल तर कदाचित तुमची झोप पूर्ण झालेली नाही. जेव्हा व्यक्तीला पुरेशी झोप मिळत नाही तेव्हा त्या व्यक्तीला जास्त प्रमाणात कॉफी पिण्याची सवय लागते.
6/ 6
सतत चिडचिड करणं, राग येणं हेदेखील अपुऱ्या झोपेचं लक्ष आहे.