अॅपलची सुरुवात 1 एप्रिल 1976 साली झाली. कंपनी सुरू करणाऱ्यांमध्ये स्टीव जॉब्स, स्टीव वॉजनिएक आणि रोनाल्ड वेन सहभागी होते. रोनाल्ड वेन हे त्यावेळी कंपनीत सर्वात अनुभवी व्यक्ती होते. रोनाल्ड यांनीच अॅपलचा लोगो तयार केला. एवढंच नाहीतर अॅपल कंपनीच्या भागिदारीत रोनाल्ड यांचे नाव होते. पण असं काही घडलं की रोनाल्ड यांनी त्यावेळी 800 डाॅलर घेऊन आपले शेअर विकून टाकले आणि कंपनी सोडून दिली.
रोनाल्ड यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय हा स्वत:चा होता. त्यांना स्टीव्ह जाॅब्ससोबत काम करण्यास अडचण येत होती. स्टीव्ह जाॅब्स लोकांसोबत चांगले वागत होते पण ते खूप जिद्दी आणि तडजोड करणारे व्यक्ती होते. 21 वर्षांचे स्टीव्ह जाॅब्स, 25 वर्षांचे स्टीव वॉजनियक आणि 42 वर्षांचे रोनाल्ड वेन अशी ही तिघांची टीम होती. त्यावेळी रोनाल्ड यांचे कंपनी 10 टक्के भागधारक होते.
हळूहळू अॅपल कंपनी मोठी होत गेली. आज जगातली सर्वात मोठी टेक्नोलाॅजी कंपनी म्हणून अॅपलचा बोलबाला आहे. पण रोनाल्ड हे याचा भाग नाही. रोनाल्ड यांच्याशिवाय अॅपल कंपनीचे काही महत्त्व नव्हते हे फार कमी लोकांना माहिती आहे. पण आज अॅपल कंपनी ज्या उंचीवर पोहोचली आहे तिच्यापुढे रोनाल्ड कमनशिबीच म्हणावे लागतील.