जालन्यात 55 वर्षीय व्यक्तीने स्वत:ला भर रस्त्यात पेटवून घेतलं
विशवनाथ उत्तमराव जाधव असं 55 वर्षीय जखमी इसमाचं नाव आहे.
|
1/ 5
विजय कमळे पाटील, जालना, 21 ऑगस्ट : रोडवर असलेल्या टपरीच्या वादातून एका इसमाने स्वतःला पेटवून घेतल्याची खळबळजनक घटना आज भरदिवसा जालना शहरातील खडकपुरा भागात घडली. घटनेत इसम गंभीररीत्या भाजला. जखमी व्यक्तीची प्रकृती अत्यावस्थ आहे.
2/ 5
विशवनाथ उत्तमराव जाधव असं 55 वर्षीय जखमी इसमाचं नाव असून शहरातील अलंकार चौकाजवळील खडकपुऱ्यातील एका छोट्याश्या टपरीच्या ढोल,तबला सारख्या वाद्यांची दुरुस्ती करून तो आपला उदरनिर्वाह चालवत होता.
3/ 5
काही दिवसांपूर्वी रस्ता निर्मितीसाठी सदर व्यक्तीची टपरी हटवण्यात आली होती.
4/ 5
दरम्यान, सदर टपरी परत त्या जागेवर ठेवण्यास शेजारी राहणाऱ्या कुटुंबाकडून विरोध करण्यात येत होता. शेजाऱ्यांनी त्याच्या टपरीच्या जागेवर एक कार आणून उभी केली होती. याच टपरीच्या वादातून विशवनाथ जाधव याने स्वतःला पेटवून घेतले.
5/ 5
या घटनेत विशवनाथ गंभीररीत्या भाजला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेनंतर संतप्त जमावाने त्या कारची तोडफोड केली. घटनास्थळी तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्याने पोलिसांचा मोठा फोजफाटा तैनात करण्यात आला होता.