ट्रायने आयफोन युजर्ससाठी डू-नॉट-डिस्टर्ब (DND) ऍपचे नवे वर्जन DND 2.0 ऍप डिजाइन केले आहे. मात्र, ऍपलने अद्याप त्याचा समावेश आपल्या प्लेस्टोअर यादित केलेला नाही. फेक कॉल्स आणि स्पॅम मैसेजेसवर रोकण्यासाठी टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात ट्रायने दुरसंचार कंपन्यांसाठी नवी नियमावली तयार केली आहे. माहीती अशी आहे की, ऍपलसोबत सुरू असलेल्या टेक्नोसॅव्ही युद्धात ट्राय ऍपलविरु आणखीन कठोर पावले उचलण्याची शक्यता आहे. असे म्हटले जात आहे की, ट्राय एयरटेल, वोडाफोन सारख्या कंपन्यांविरुद्ध नोटिस जाहिर करुन ऍपलचे रेजिस्ट्रेशन रद्द करू शकते.
वास्तविक पाहता, ऍपल आणि ट्राय याच्यात डू-नॉट-डिस्टर्ब (DND) या ऍपवरूनच शितयुद्ध सुरू आहे. आयफोन यूजर्सचे फेक कॉल्स आणि स्पॅम मैसेजेस फिल्टर करण्यासाठीच ट्रायने डू-नॉट-डिस्टर्ब (DND) ऍपचे नवे वर्जन DND 2.0 ऍप डिजाइन केले आहे. त्याचा समावेश ऍपलने आपल्या प्ले-लिस्टमध्ये करावा असे ट्रायचे म्हणणे आहे. परंतू ऍपलचे म्हणणे आहे की...