भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पहिली टेस्ट पाच फेब्रुवारीपासून चेन्नईमध्ये सुरु होत आहे. दोन्ही टीममध्ये आजवर 122 टेस्ट झाल्या असून त्यापैकी इंग्लंडनं 47 तर भारतानं 26 टेस्ट जिंकल्या आहेत, तर 49 टेस्ट ड्रॉ झाल्या. यापूर्वी भारतामध्ये झालेली टेस्ट पाच टेस्ट मॅचची सीरिज टीम इंडियानं (Team India) 4-0 नं जिंकली होती. मागील काही वर्षांमध्ये भारतीय बॅट्समन्सचा या सीरिजमध्ये दबदबा आहे. इंग्लंडविरुद्ध सर्वात जास्त टेस्ट सेंच्युरी कुणी झळकावल्या आहेत. ते पाहूया ( फोटो - Sachin Tendulkar Instagram, BCCCI/Twitter)
राहुल द्रविड - इंग्लंडविरुद्ध सर्वाात जास्त सेंच्युरी झळकावण्याच्या यादीत राहुल द्रविड (Rahul Dravid) संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानं 164 टेस्ट मॅचच्या करियरमध्ये इंग्लंड विरुद्ध सात सेंच्युरी झळकावल्या आहेत. द्रविडनं इंग्लंडविरुद्ध 21 मॅचमध्ये 60 पेक्षा अधिक सरासरीनं 1950 रन केले आहेत. यामध्ये एका डबल सेंच्युरीचाही समावेश आहे. (BCCI/Twitter)
सचिन तेंडुलकर - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) राहुल द्रविडच्या बरोबरीनं इंग्लंडविरुद्ध सात सेंच्युरी झळकावल्या आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या सचिननं इंग्लंडविरुद्ध 2535 रन केले आहेत. यामध्ये सात सेंच्युरी आणि 13 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. ( Sachin Tendulkar/instagram)
चेतेश्वर पुजारा - 'मॉडर्न वॉल' अशी ओळख असलेल्या चेतेश्वर पुजाराचा इंग्लडविरुद्ध जोरदार रेकॉर्ड आहे. तो या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. पुजारानं इंग्लंड विरुद्ध 18 टेस्टमध्ये पाच सेंच्युरी झळकावल्या आहेत. भारतामध्ये इंग्लंड विरुद्ध पुजारानं 839 रन्स केले असून आगामी सीरिजमध्ये देखील त्याच्यावर मोठी भिस्त असेल. (Cheteshwar Pujara/AP)