'सेक्स केला तरच चित्रपटात मिळेल काम'; बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रीने मांडली खळबळजनक व्यथा
या कारणामुळे अनेक चित्रपट हातातून गेले आहेत
|
1/ 8
बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेख ही दंगल या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आली. गेल्या काही वर्षातच तिने बॉलिवूडमध्ये आपलं नाव कमावलं आहे. ती अनेक मोठमोठ्या प्रोजेक्टचा भाग राहिली आहे. आता पुन्हा एकदा ती एक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
2/ 8
अभिनेत्री लुडो आणि सूरज पे मंगल भाजी सारख्या चित्रपटांचा भाग असेल. नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीने आपल्या स्ट्रगलबद्दल सांगितलं. तिने सांगितले की आयुष्यात मला अनेक संकटांचा सामना करावा लागला. चित्रपटात काम मिळणं इतकं सोपं नसल्याचं तिने सांगितलं.
3/ 8
अभिनेत्रीने पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, जेव्हा ती 3 वर्षांची होती, त्यावेळी तिच्यासोबत छेडछाड झाली होती. महिलांसाठी हे मोठ्या डागासारखं असतं ज्याबद्दल ती केव्हाच बोलू शकत नाही.
4/ 8
मात्र आता जग बदललं. आता लैंगिक शोषणाबद्दल जगात जागरुकता वाढली आहे. पहिल्यांदा तर याबद्दल न बोलण्याचा सल्ला दिला जात होता.
5/ 8
कास्टिंग काऊचबाबत बोलताना फातिमा म्हणाली की, मी कास्टिंग काऊचचा सामना केला आहे. जीवनात अशीही वेळ आली होती, जेव्हा म्हटलं होतं की सेक्स केल्यानंतरच काम मिळेल.
6/ 8
यामुळे अनेकदा असं झालं आहे की, माझ्या हातातून चित्रपटात काम करण्याच्या अनेक संधी निघून गेल्या. अनेकदा तर अचानक मला चित्रपटातून काढून टाकण्यात आलं. अनेकदा या कारणामुळे मला रिप्लेस करण्यात आलं.
7/ 8
फातिमा सना शेखने अनेक चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारली आहे. ती दोन दशकांपासून चित्रपट क्षेत्राचा भाग आहे. तिने इश्क, चाची 420, वन टू का फोर आणि बडे दिलवाला सारख्या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारली आहे.
8/ 8
आमिर खान याचा चित्रपट दंगल मधून अभिनेत्री 2016 मध्ये मुख्य भूमिकेतून दिसली. त्यानंतर ती ठग्ज ऑफ हिंदोस्तानचा भाग झाली होती. आता अभिनेत्री लुडो आणि सूरज पर मंगल भारी सारख्या चित्रपटात दिसली.