घरातल्या कामांतून वेळ मिळेना; गृहिणींनी स्वत:ला कसं ठेवावं फिट
घरच्या घरीही अगदी सहजसोप्या पद्धतीने फिट राहता येऊ शकतं.
|
1/ 5
सध्या लॉकडाऊनमुळे प्रत्येक जण घरात असल्याने गृहिणींचं काम अधिकच वाढलं आहे. त्यामुळे त्यांना स्वत:ला वेळ देता येत नाही. फिट राहण्यासाठी घराबाहेर पडणं शक्य होत नाही. मात्र घरच्या घरीही फिट कसं राहायचं यासाठी टीप्स.
2/ 5
चालणं हा उत्तम असा व्यायाम आहे. चालण्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. घरच्या घरीही तुम्ही चालू शकता. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि आरोग्यही सुधारतं.
3/ 5
लहानपणी आपण सर्वच दोरीउड्या खेळलो आहोत. आता तुम्हाला तेच करायचं आहे. घरच्या घरी फिट राहण्यासाठी तुम्ही दररोज किमान 10 मिनिटं दोरीउड्या मारू शकता. हा फूल बॉडी वर्कआऊट आहे. हाडं आणि स्नायूही हेल्दी राहतात. शिवाय वजन कमी होण्यास मदत होते. (फोटो- PIXABAY)
4/ 5
तुम्हाला डान्सची आवड असेल तर तुमच्या या आवडीनेच तुम्ही फिट राहू शकता. आवडत्या गाण्यावर थिरका आणि फिट राहा, वजन कमी करा. तुम्ही तुमच्या कुटुंबासह डान्सचा आनंद घेऊ शकता.
5/ 5
घरातील कामं करण्यापूर्वी सकाळी उठल्यार थोडा वेळ बेडवरच योगा करा. शिवाय बेडवर सहजसोपे करता येतील अशी व्यायाम करा.