तुमच्या मुलांनाही जंत झालेत का? मग घरच्या घरी हा उपाय करा
पोटासंबंधी समस्यांवर ओवा गुणकारी आहे.
|
1/ 5
लहान मुलं चॉकलेट, मिठाई किंवा गोड पदार्थ जास्त खातात. त्यामुळे त्यांच्या पोटात जंत होतात. मुलांना गोड खाण्यापासून रोखणं तर अशक्य असतं मग त्यांना जंताचं औषध दिलं जातं.
2/ 5
मात्र लहान मुलांना वारंवार औषध देणंही योग्य नाही. अशावेळी तुम्ही घरच्या घरीदेखील काही उपाय करू शकता आणि जंतावर परिणामकारक असा उपाय म्हणजे ओवा.
3/ 5
माय उपचारसंबंधित डॉ. लक्ष्मीदत्ता शुक्ला यांनी सांगितलं, घरगुती उपाय करण्यासाठी ओवा खूप गुणकारी आहे. विशेषत: पोटाच्या समस्यांवर ओव्यापेक्षा दुसरा चांगला उपचार नाही.
4/ 5
लहान मुलांना जंत झाल्यास 5 ग्रॅम गूळ द्या आणि त्यावर ओव्याचं 1 ते 2 ग्रॅम चूर्ण द्या आणि मग पाणी द्या. पोटातील जंत आपोआप मरतील.
5/ 5
तुम्हाला पोटदुखीची समस्या असेल तर 12 ग्रॅम ओव्याच्या चूर्णात 250 मिलीग्रॅम काळं मीठ टाकून खाऊ शकता. किंवा ओ्व्याच्या तेलात सूंठ मिसळून खाऊ शकता. तसंच ओव्याच्या काढ्यात गूळ टाकून प्यायलात तरीदेखील पोटदुखीपासून आराम मिळेल.