झारखंडमधील गढवा शहरातून एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे चार वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावावरील घर देण्यात आलं आहे. इतकच नाही तर गेल्या महिन्यात मृत व्यक्तीच्या बँकेतून पैसेही काढण्यात आले. मृताच्या बँकेतून पैसे काढणे आणि सरकारने केलेल्या राहण्याची सोयीमुळे गावात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
वास्तविक ही बाब जिल्ह्यातील डंडई प्रखण्डमधील जरही गावातील आहे. जेथे धनेसर राम नावाच्या व्यक्तीला पीएम आवास 2016-17 मध्ये मिळालं होतं. आणि त्याने गेल्या महिन्यात म्हणजेच 20 ऑक्टोबर 2020 रोजी चाळीस हजारांचा पहिला हप्ता बॅंकेतून काढला आहे. त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बाब काही दिवसांनंतर उघड झाली.
दुसरीकडे, जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना जेव्हा याबाबत सूचना मिळाली, त्यांनी तातडीने याच्या चौकशीचे आदेश बीडीओंना दिले आहेत. डीआरडीएसोबत प्रभारी जिल्हा अधिकारी अनिल क्लोमेंट ओढया यांनी सांगितलं की, हा प्रकार समोर येताच याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय लवकरच याचा खुलासा करीत दोषींविरोधात कारवाई करण्यात येईल.