अॅलर्जीपासून मुक्ती हवी, मग आहारात 'या' पदार्थांचा समावेश जरूर करा
अॅलर्जीमुळे हैराण झालात, तर मग औषधांसोबत आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा
|
1/ 6
सफरचंद - सफरचंदामध्ये quercetin हे अँटिऑक्सिडंट असतं, जे अॅलर्जीशी लढा देतं, शिवाय शरीराला आवश्यक न्यूट्रिएंटसही पुरवतं.
2/ 6
अननस - यामध्ये ब्रोमोलेन (bromelain) असतं, जे सर्दी पातळ करतं आणि अॅलर्जी कमी होण्यासही मदत होते.
3/ 6
दही – दही हे प्रोबायोटिक आहे. प्रोबायोटिकमध्ये अँटी-अॅलर्जिक आणि अँटी इन्फ्लेमेटरी घटक असतात, जे तुम्हाला अॅलर्जीपासून आराम देतात.
4/ 6
मध - एका संशोधनानुसार मध अॅलर्जीपासून संरक्षण देतं. आपल्या स्थानिक ठिकाणी तयार झालेलं मध अॅलर्जीशी लढण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतं.
5/ 6
व्हिटॅमिन C युक्त फळे - शरीरात हिस्टामाइनची निर्मिती जास्त झाल्यास अॅलर्जीची समस्या उद्भवते. व्हिटॅमिन सी या हिस्टामाइनच्या निर्मितीला रोखतं आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या अॅलर्जीपासून आराम मिळतो.
6/ 6
सुकामेवा - बदाम, काजू यासारख्या सुकामेवा अॅलर्जीशी लढण्यासाठी सक्षम आहे कारण यामध्ये मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात आहे. मॅग्नेशिअममुळे अॅलर्जिक रिअॅक्शन लगेच कमी होते.