१२ देश, १२ भाव : ६० पैसे लीटर दराने पेट्रोल विकणारा देश माहिती आहे का?
सध्या भारतात पेट्रोल आणि डिझेलला सोन्याचा भाव आला आहे. मुंबईत पेट्रोलचा दर ८९.५४ रुपयापर्यंत पोहोचलाय. परभणीत पेट्रोलनं नव्वदी पार केलीये. पण तुम्हाला माहिती आहे का जगात असेही काही देश आहेत जिथे पेट्रोलचा दर अगदी काही पैसे आहे आणि असेही काही देश आहेत जिथे पेट्रोलचा दर आपल्या देशातल्या दराच्या दुप्पट आहे.


सध्या भारतात पेट्रोल आणि डिझेलला सोन्याचा भाव आला आहे. मुंबईत पेट्रोलचा दर ८९.५४ रुपयापर्यंत पोहोचलाय. परभणीत पेट्रोलनं नव्वदी पार केलीये. आज आम्ही तुम्हाला अशा 11 देशांबद्दल सांगणार आहोत जिथे काही ठिकाणी पेट्रोलचा दर सर्वात कमी आहे तर काही ठिकाणी भारतापेक्षा जास्त दर आहे. सध्या भारतात पेट्रोल आणि डिझेलला सोन्याचा भाव आला आहे. मुंबईत पेट्रोलचा दर ८९.५४ रुपयापर्यंत पोहोचलाय. परभणीत पेट्रोलनं नव्वदी पार केलीये. आज आम्ही तुम्हाला अशा 11 देशांबद्दल सांगणार आहोत जिथे काही ठिकाणी पेट्रोलचा दर सर्वात कमी आहे तर काही ठिकाणी भारतापेक्षा जास्त दर आहे.


व्हेनेझुएला तुम्हाला विश्वास बसणार नाही, दक्षिण अमेरिकेतल्या या देशात चक्क पेट्रोलचा भाव ०.६१ रुपये आहे. या दराच्या तुलनेत भारतात पेट्रोल १०० पटीने जास्त महाग आहे.


इराण : इराण हा मोठा तेल उत्पादक देश आहे. भारताला इंधनपुरवठा इराणकडून होतो. सहाजिकच इराणमध्ये पेट्रोल स्वस्त आहे. या देशात पेट्रोलचा दर २०.५१ रुपये लीटर आहे.


सुदान : सुदानमध्ये पेट्रोलच्या एका लीटरची किंमत कमी आहे. हा देश आफ्रिकेतल्या गरीब देशांपैकी एक. त्यामुळे इंधनाचे दर नियंत्रित आहेत. तिथे पेट्रोल २४.५७ रुपये लीटर आहे.


कुवैत : हा एक आखाती देश आहे. हासुद्धा तेलउत्पादक देश आहे. त्यामुळे इंधनदर इथे अगदीच सामान्य आहे या देशात सध्या पेट्रोल २४. ९५ रुपये आहे.


पाकिस्तान : भारताप्रमाणेच पाकिस्तानातही पेट्रोल उत्पादन नगण्य आहे. सरकारचं इंधनदरावर नियंत्रण आहे. त्यामुळे या देशातही पेट्रोल ५३.९२ रुपये प्रति लीटर दराने मिळतं.


बार्बाडोस : असेही काही देश आहेत, जिथे इंधनदर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या इंधनदरावरून कमी-जास्त होतात. तिथल्या सरकारचं नियंत्रण त्यावर नसतं. पॅसिफिक महासागरच्या पश्चिम भागात कॅरेबियन बेटांवर असणाऱ्या बार्बाडोस या देशात पेट्रोल सध्या भारतीय रुपयांच्या हिशोबाने १४०.५६ रुपये प्रती लीटरने उपलब्ध आहे.


नेदरलँड : या युरोपीयन देशात लीटरला १४१.२३ रुपये मोजावे लागतात. हा युरोपातला अत्याधुनिक आणि विकसित देश. नेदरलँड्समध्ये पेट्रोल भरण्यासाठी रोबोचा वापर केला जातो.


नॉर्वे : स्कँडेनेव्हियन देशांतला हा एक देश. नॉर्वेत इंधन दर जास्त आहे. पण इथल्या स्थानिकांचं दरडोई उत्पन्नसुद्धा बरंच जास्त आहे. भारतीय चलनात कन्व्हर्ट केलं तर नॉर्वेमध्ये पेट्रोलसाठी लीटरला १४८.३३ रुपये मिळतात.


आइसलंड : या थंड प्रदेशात पेट्रोल १४९.९० रुपये लीटर दराने मिळतं. इथेही लोकसंख्या मर्यादित. इंधन उत्पादन होत नाही, पण दरडोई उत्पन्न मात्र जास्त आहे.