सामान्य म्हणून डोकेदुखीकडे दुर्लक्ष नको; कित्येक आजारांचं आहे हे लक्षण
डोकेदुखीचे (headache) अनेक प्रकार आहेत आणि त्यांची कारणंही वेगवेगळी आहेत.
|
1/ 11
डोकेदुखीची समस्या ही बहुतेकांना असतेच. काही जणांचं डोकं कधीतरी दुखतं, काही जणांना ही समस्या रोजचं भेडसावते. काही जणांना सौम्य डोकेदुखी असते, तर काही जणांसाठी हे डोकेदुखी असह्य ठरते. डोकेदुखीचा कालावधी, तीव्रता आणि प्रकार वेगवेगवेगळे आहेत.
2/ 11
माय उपचारशी संबंधित एम्सचे डॉ. केएम नाधीर यांनी सांगितलं, डोक्यात तीव्र किंवा सौम्य स्वरूपाच्या वेदना होतात. डोकेदुखी हळूहळू वाढत जाते आणि काही तास किंवा काही दिवसांपर्यंत राहू शकते. डोकेदुखी फक्त एकाच प्रकारची नसते, तर त्याचे अनेक प्रकार आहेत.
3/ 11
अनेकदा लोकांना आपलं डोकं का दुखत आहे, हे माहिती नसतं. सामान्य डोकेदुखी म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं, मात्र डोकेदुखी हे एखाद्या आजाराचं लक्षण असू शकतं.
4/ 11
सामान्यपणे डोकेदुखीच कारण म्हणजे तणाव. अतिरिक्त काम, अनियमित आहार आणि झोप, अति मद्यपान यामुळे ही डोकेदुखी उद्भवते. जीवनशैलीत बदल आणि आराम करून अशा डोकेदुखीपासून सुटका मिळू शकते.
5/ 11
डोकेदुखीचं दुसरं कारण म्हणजे मायग्रेन. सध्या अनेकांना ही समस्या आहे. काही तास ते काही दिवसांपर्यंत डोकं दुखतं. माय उपचारवर माहिती देताना एम्सचे डॉ. नबी वली यांनी सांगितलं, मायग्रेनमध्ये डोक्याच्या एका किंवा दोन्ही बाजूंना खूप वेदना होतात.
6/ 11
हार्मोन्समध्ये बदल, तणाव, अनियमित जीनवशैली मायग्रेनसाठी कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं. संतुलित आहार, पुरेशी झोप, व्यायाम आणि जास्त आवाजापासून दूर राहिल्याने या डोकेदुखीपासून आराम मिळतो.
7/ 11
क्लस्टर डोकेदुखी ही दुर्मिळ समस्या आहे. मात्र यामध्ये मायग्रेनपेक्षाही अधिक वेदना होतात. महिलांपेक्षआ पुरुषांना ही डोकेदुखी जास्त सतावते. चेन स्मोकर्सना अशी डोकेदुखी अधिक असते.
8/ 11
काही आठवडे, महिन्यांमध्ये एक ते आठ वेळा डोकं दुखत राहतं. सहसा रात्रीच डोक्यात वेदना सुरू होतात. डोळ्यांच्याभोवतीही वेदना जाणवतात. सामान्यपणे 15 मिनिटं ते 3 तासांपर्यंत या वेदना अशाच राहतात.
9/ 11
साइनस हे डोकेदुखीचं आणखी सर्वसामान्य कारण माय उपचारवर माहिती देताना डॉ. आयुष पांडे यांनी सांगितलं, साइनस म्हणजे साइनोसाइटिस हा नाकासंबंधी एक आजार आहे. यामध्ये व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास होता. चेहऱ्याच्या स्नायूंमध्येही वेदना सुरू होतात.
10/ 11
बॅक्टेरिया, फंगल, अॅलर्जी, नाकाचं हाड वाढणं, अस्थमा अशा कारणांमुळे साइनस होतो. साइनसमध्ये सूज किंवा संक्रमणामुळे चेहरा, डोकं आणि डोळ्यांवर ताण पडतो.
11/ 11
त्यामुळे तुम्हाला कधीतरी डोकेदुखी होत असेल तर ठिक आहे. मात्र वारंवार अशी समस्या असेल तर मात्र डॉक्टरांकडे जा आणि डोकेदुखीचं योग्य निदान करून आवश्यक ते उपचार करून घ्या.