आयसीएमआरने सांगितलं, गार्गल सॅम्पल महत्त्वपूर्ण ठरेल. कारण गुळण्या करणं ही सोपी अशी प्रक्रिया आहे, यासाठी प्रशिक्षणाचीही गरज नाही. कुणालाही स्वत:हून नमुने देता येईल. आरोग्य कर्मचाऱ्यांनादेखील हे सोयीस्कर ठरेल कारण त्यांना नमुने घेताना कोरोनाचा धोका राहणार नाही.