गणपती बाप्पांच्या आगमनाची लगबग सुरूच झाली आहे. कोरोना लॉकडाऊनमध्येही अगदी साधेपणाने आणि मोजक्याच लोकांमध्ये का होईना बाप्पांचं स्वागत केलं जाणार आहे. अनेकांनी बाप्पासाठी घरच्या घरी डेकोरेशन तयार केलं आहे. तर काहींनी घरच्या घरीच बाप्पाच्या मूर्ती घडवल्या आहेत. यामध्ये सेलिब्रिटीही मागे नाहीत. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)