

फुटबाॅल चाहते काय करतील याचा काही नेम नाही. रशियाच्या टीमची कट्टर फॅन असलेल्या एका मॉडेलने पूनम पांडे प्रमाणे टीम जिंकल्यावर न्यूड होण्याची घोषणाच केली होती. पण नेमकी काल ती मॅचला गैरहजर राहिली आणि टीमचा पराभव झाला असं म्हटलं जातंय.


फीफा वर्ल्डकपमध्ये स्पेनला पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणाऱ्या यजमान रशियाला पराभवाचा धक्का बसलाय. क्रोएशियाने पेनल्टी शूट आऊटमध्ये 4-3ने रशियाला पराभूत केलंय. दोन्ही टीमने 2-2 गोल केले होते. पण दबावाखाली आलेल्या रशियन खेळाडूंचा आत्मविश्वास कमी झाला आणि टीम मॅच पराभूत झाली.


विशेष म्हणजे रशियन टीमचा परफाॅर्मन्स दमदार राहिला. रशियन टीमला आपल्या होमग्राऊंडवर इतिहास रचण्याची संधी होती. 28 वर्षीय माजी मिल मॉस्को नताल्या नेमचिनोवा ही आपल्या रशियन टीमच्या प्रत्येक सामन्याला हजेरी लावत होती. तिच्या या उपस्थितीमुळे टीमला विजय मिळत होता असा तर्कच रशियन चाहत्यांनी लावला.


उपांत्यपूर्व फेरीत स्पेनला पराभूत केल्यानंतर नताल्याने रशियन टीम फीफा वर्ल्डकप जिंकली तर न्यूड फोटोशूट करणार अशी घोषणाच करून टाकली पण तसं होऊ शकलं नाही.


क्रोएशियाच्या टीमने रशियाला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत केलं. विशेष म्हणजे या सामन्याला नताल्या स्टेडियमध्ये आलीच नव्हती.


2007 मध्ये मिस मॉस्को झाल्यानंतर नताल्या नेमचिनोवावर पॉर्नस्टार असल्याचा आरोप झाला होता. पण तिने तो नाकारला होता.