केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) सेवा परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. यात एक नाव चर्चेत होते ते म्हणजे ऐश्वर्या शिवराण (Aishwarya Sheoran). ऐश्वर्याने या परीक्षेत 93वा रॅंक मिळवला आहे.फोटो सौजन्य-जीक्यू मॅगजीन
2/ 6
मुख्य म्हणजे ऐश्वर्या फक्त UPSCमधील यशस्वी उमेदवारांच्या यादीतच नाही तर ती मिस इंडिया फायनलिस्टही (Femina Miss India) होती. फोटो सौजन्य-जीक्यू मॅगजीन
3/ 6
टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्याने सांगितले की, तिच्या आईने ऐश्वर्या रायच्या नावावरून तिचे नाव ठेवले होते. कारण आईची इच्छा होती ती ऐश्वर्यानेही मिस इंडिया व्हावे.
4/ 6
त्यानंतर मिस इंडियाच्या 21 फायनलिस्टमध्ये तिची निवड झाली. मात्र ऐश्वर्याचे स्वप्न हे सिव्हिल सर्व्हिसमध्ये काम करायचेच होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऐश्वर्याने मॉडेलिंग कारकीर्दीतून ब्रेक घेतला आणि सिव्हिल सर्व्हिस परीक्षेची तयारी सुरू केली.
5/ 6
ऐश्वर्याने UPSCच्या परीक्षेत मिळवलेले यश हे कोणत्याही क्लासेस शिवाय मिळवलेले होते. परीक्षेच्या काळात ऐश्वर्याने फोन बंद केला आणि ती सोशल मीडियापासून दूर होते. जेणेकरून मी परीक्षेवर लक्ष केंद्रीत करू शकेल.
6/ 6
ऐश्वर्याचे वडील कर्नल अजय कुमार एनसीसी तेलंगाना बटालियनचे कमांडिंग ऑफिसर आहेत. ऐश्वर्याच्या मते सैन्यात महिलांना संधी दिली जाते, परंतु अजूनही महिलांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळेच ऐश्वर्याने सिव्हिल सर्व्हिसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.