कच्छसारख्या प्रदेशात सफरचंदाची लागवड होऊ शकते, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही, मात्र हे खरं आहे.
|
1/ 15
सफरचंद म्हटलं की सर्वात आधी समोर येतं ते थंड हवेचं ठिकाण. हिमाचल प्रदेश, काश्मीर, शिमला अशा ठिकाणची सफरचंद.
2/ 15
सामान्यपणे थंड प्रदेशातच सफरचंदाची लागवड केली जाते. या ठिकाणच्या सफरचंदांचा रंग आकर्षक असतोच शिवाय ते चवीलाही गोड असतात.
3/ 15
थंड प्रदेशात लागवड होणारे सफरचंद उष्ण प्रदेशात घ्यायचं म्हटलं तर ते कसं काय शक्य आहे असंच आधी प्रत्येकाला वाटेल.
4/ 15
मात्र तुम्हाला ऐकायला आश्चर्य वाटेल, आता फोटोमध्ये तुम्ही जे लालबुंद असे सफरचंद पाहात आहात ते हुडहुडी भरवणाऱ्या थंड प्रदेशातील नव्हे तर अगदी रणरणतं ऊन असलेल्या प्रदेशातील आहेत
5/ 15
गुजरातच्या कच्छमध्ये या सफरचंदांची लागवड करण्यात आली आहे. जिथं तापमान चाळीशी पार असतं.
6/ 15
इतक्या थंड प्रदेशात तग धरणारे सफरचंद रणरणतं ऊन असलेल्या कच्छसारख्या प्रदेशातही तग धरू शकतात, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
7/ 15
आपल्याला कठीण वाटणारी ही गोष्ट प्रत्यक्षात केली ती कच्छमधील प्रयोगशील शेतकरी शांतीलाल मावानी यांनी. शांतीलाल यांनी कच्छसारख्या उष्ण प्रदेशातही काश्मीरसारखे लालबुंद सफरचंद पिकवून दाखवले आहेत.
8/ 15
शांतीलाल यांनी हिमाचल प्रदेशच्या शिमलाहून सफरचंदाची रोपे आणली आणि त्याची लागवड गुजरातमध्ये केली. एका रोपाची किंमत 280 रुपये आहे.
9/ 15
गुजरातच्या कच्छमधील आपल्या खिरसारा गावात शांतीलाल यांनी सफरचंदांची लागवड करायला सुरुवात केली.
10/ 15
थंड वातावरणातील फळ उष्ण वातावरणात घ्यायचं म्हटल्यावर आवश्यक ती काळजी घ्यायलाच हवी, ती पूर्ण काळजी शांतीलाल यांनी घेतली.
11/ 15
सफरचंदांच्या रोपांना जास्त ऊन लागू नये म्हणून त्यांनी हिरव्या जाळ्यांचे शेड उभारले. तसंच आवश्यक तशा पाण्याचीही सोय केली.
12/ 15
शांतीलाल यांनी आणलेलं हे छोटंसं रोपटं आता दहा फूट उंच झालं आहे. या सफरचंदाच्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे दोन वर्षांनी त्याला फळं येतात.
13/ 15
एका झाडाला 35 ते 36 सफरचंद आलेत. पुढील वर्षांपासून आणखी जास्त फळं येतील, असं शांतीलाल यांनी सांगितलं.
14/ 15
आता जी सफरचंदाने भरलेली ही झाडं दिसत आहेत ही शांतीलाल यांच्या मेहनतीचं फळ आहे.
15/ 15
गेल्या पाच वर्षांपासून शांतीलाल काश्मीरसारखे सफरचंद आपल्या कच्छमध्ये उत्पादित करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळालं आहे.