झारखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने सर्व नियम अधिक कडक केले आहे. या नव्या अध्यादेशानुसार रस्ता, बाजार किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना मास्क लावणे अनिवार्य आहे. याशिवाय सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासही सांगण्यात आले आहे.