तुम्ही चेहरा चुकीच्या पद्धतीने तर धुत नाहीत ना? जाणून घ्या योग्य पद्धत
चेहरा धुतानाही (Face cleaning) काळजी घेणं गरजेचं आहे.
|
1/ 8
चेहऱ्यावरील धूळ, अस्वच्छता, तेल दूर करण्यासाठी चेहरा धुणं गरजेचं आहे. मात्र अनेकांना दिवसातून अनेकदा चेहरा धुण्याची सवय असते. ही सवय चांगली नाही. वारंवार चेहरा धुतल्याने चेहऱ्याला हानी पोहोचू शकते.
2/ 8
चेहरा सकाळी आणि संध्याकाळी असा 2 वेळा धुवायला हवा. तुम्ही बाहेर कामासाठी जात असाल तर कामाच्या आधी आणि कामाच्या नंतर असा दिवसातून 4 वेळा चेहरा धुणं ठिक आहे. मात्र त्यापेक्षा जास्त वेळा चेहरा धुवू नका.
3/ 8
चेहरा धुताना शक्यतो साबण टाळा आणि क्लिनझर, फेसवॉशचा वापर करा.
4/ 8
जर तुमची त्वचा नॉर्मल टू ड्राय असेल तर हायड्रेटिंग आणि क्रिमी क्लिनझर वापरा. जर त्वचा संवेदनशील असेल तर जेंटल क्लिनझर वापरा, त्वचा ऑईली असेल तर फेसवॉश वापरा, कॉम्बिनेशन स्किन असेल तर फोमिंग किंवा जेल क्लिनझर वापरा.
5/ 8
क्लिनझर वापरण्याचीदेखील एक पद्धत असते. तुम्ही क्लिनझिंग लोशन वापरत असाल तर मॉईश्चरायझरप्रमाणे ड्राय स्किनवर काही मिनिटं चोळा. जेल किंवा फोम्स वापरत असाल तर सुरुवातीला चेहरा ओला करा आणि मग वापरा. अॅक्नेसाठी क्लिनझर वापरत असाल तर काही वेळ चेहऱ्यावर राहू द्या त्यानंतर धुवा.
6/ 8
चेहरा धुण्यासाठी अति गरम पाणी वापरू नका. गरम पाण्यामुळे चेहऱ्यावर रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. चेहरा लालसर आणि कोरडी होतो. त्यामुळे कोमट पाण्यानं चेहरा धुवा.
7/ 8
चेहरा धुतल्याने टॉवेलने जोर देऊन घासून पुसू नका. यामुळे इरिटेशन आणि रेडनसची समस्या निर्माण होईल. टॉवेलने चेहऱ्यावर टॅप करा जेणेकरून फक्त चेहऱ्यावरील पाणी शोषलं जाईल.
8/ 8
चेहरा पुसण्यासाठी वापरत असलेला टॉवेल स्वच्छ असायला हवा. वापरलेल्या टॉवेलवर बॅक्टेरिया असू शकतात. तसंच चेहरा पुसण्यासाठी बेबी टॉवेल वापरल्यास फायदेशीर कारण त्यामुळे त्वचेला हानी पोहोचत नाही.